Sunday, 19 January 2025

एथनिक लुकवर हिल्स नाही तर घाला फ्लॅट फुटवेअर, करा अशी स्टाईल...!!!


 सध्याच्या काळात महिला स्टाईल करताना अगदी लहानात लहान गोष्टीकडेही लक्षपूर्वक पाहतात. कपडे असो अथवा चप्पल सगळ्याच गोष्टी योग्य पद्धतीने स्टाईल करणे हल्ली पाहिले जाते. बऱ्याचदा अनेक कार्यक्रमांमध्ये एथनिक कपड्यांवर हाय हिल्स घातले जातात. मात्र जास्त काळ उभं राहायचं असेल तर हाय हिल्स घालून नक्कीच पायांना त्रास होतो.  त्यामुळे तुमची उंची कमी असो वा जास्त असो फुटवेअरमध्ये फ्लॅट्स घालणे अधिक चांगला पर्याय मानण्यात येतो. खरं तर अनेक महिलांना वाटतं की साडी अथवा एथनिक कपड्यांसह फ्लॅट चप्पल अथवा फुटवेअर घालू नये. पण खरं तर तुम्हाला आरामदायी लुक हवा असेल तर तुम्ही नक्कीच या चप्पल्सचा वापर करू शकता. अशाच काही फुटवेअर्सबाबत आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत. तुम्हीही अशा स्टायलिश फ्लॅट्स चप्पल्सचा वापर करा आणि बनवा तुमचा लुक अधिक सुंदर आणि स्टायलिश!

वापरा स्टायलिश फ्लॅट्स 

सध्या फुटवेअरसाठी अनेक पर्याय बाजारात तुम्हाला उपलब्ध मिळतात. इतकंच नाही तर तुम्ही तुमच्या योग्य मापाच्या फुटवेअर्स या ऑनलाईनही मागवू शकता. तुम्ही ऑफिस अथवा कॅज्युअल्समध्ये आपला लुक एलिगंट पद्धतीने करू इच्छित असाल तर त्यासाठी योग्य पर्याय म्हणजे तुम्ही तुमच्या कुरता आणि सलवारशी सुसंगत अशी स्टायलिश फ्लॅट्स फुटवेअर निवडणे. यासाठी तुम्ही रंगबेरंगी अथवा काळी – पांढरी चप्पलदेखील खरेदी करू शकता. जितके अधिक साधे तितके अधिक स्टायलिश दिसण्यास मदत मिळते. 


स्ट्राईप्स फ्लॅट्सचा करा वापर 

तुम्ही त्या महिलांपैकी एक असाल ज्यांना फ्लॅट फुटवेअरमध्ये स्टायलिश लुक कॅरी करायला आवडतो, तर तुम्ही स्ट्राईप्स फ्लॅट्सचा वापर एथनिक कपड्यांसह नक्कीच करू शकता. स्ट्राईप्समध्ये तुम्ही फ्लॅट्सशिवाय फ्लॅट्स सँडल्सचादेखील वापर करू शकता. स्ट्राईप्स फ्लॅट्स सँडल्स (Stripes Flats Sandles) तुम्हाला सेमी फॉर्मल्स लुक (Semi Formals Look) मिळवून देते आणि हे कोणत्याही कार्यक्रमासाठी तुम्ही वापरू शकता. 


ऑक्सफोर्ड देते वेगळा लुक 

एथनिक वेअर लुकमध्ये तुम्ही जर वेगवेगळे लुक करणार असाल तर तुम्ही ऑक्सफोर्ड स्टाईलचा विचार करा. लहान कुरतीसह ऑक्सफर्ड पद्धतीचे फुटवेअर (Oxford Footwear) अधिक चांगले दिसतात. न्यूट्रल टोनमध्ये तुम्ही स्टेटमेंट बॅगसह हा लुक पूर्ण करू शकता. हिल्स अथवा पॉईंटेड हिल्सच्या ऐवजी तुम्ही ऑक्सफोर्ड चप्पल्सचा लुक वापरा. हा तुम्हाला अधिक स्टायलिश दिसण्यास मदत करतो. 

No comments:

Post a Comment

Plot vs Flat – Which One Is the Better Investment Option?

  Plot vs Flat: Key Considerations Effort Plot: Investing in a plot demands substantial effort. It involves an intricate process, from draft...