Friday, 14 February 2025

महाकुंभ मेळा


महाकुंभ मेळ्याचा इतिहास हजारो वर्षांपूर्वीचा आहे. या मेळ्याची परंपरा चार पवित्र ठिकाणी (प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन, आणि नाशिक) दर 12 वर्षांनी साजरी केली जाते.

 

महाकुंभ मेळ्याबद्दल माहिती:

 

·       पौराणिक कथेनुसार, विष्णू अमृताचा कुंभ घेऊन जात असताना भांडण झाले आणि चार थेंब सांडले. ते प्रयाग, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन या चार तीर्थांवर पडले.

·       मुस्लिम शासकांच्या आक्रमणापासून हिंदू धर्माचे आणि तीर्थक्षेत्र स्थळांचे रक्षण करण्यासाठी आखाडे निर्माण झाले असे मानले जाते.

·       कुंभमेळ्यात या सर्व आखाड्यांच्या साधूंचे विशेष आदराने स्वागत केले जाते.

·       कुंभमेळा ही पृथ्वीवरील यात्रेकरूंची सर्वात मोठी शांततामय सभा आहे.

·       या मेळ्यात सहभागी पवित्र नदीत स्नान करतात किंवा डुबकी मारतात.

 

दर  तीन वर्षांनंतर एकदा अश्या पद्धतीने बारा वर्षांत प्रयागराज, उज्जैन, नाशिक (त्र्यंबकेश्वर), हरिद्वार या चार वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री पूर्ण कुंभमेळे भरत असतात. दर सहा वर्षांनी हरिद्वार व प्रयाग येथे अर्धकुंभमेळा भरतो.बारा पूर्ण कुंभमेळ्यांनंतर तब्बल १४४ वर्षांनंतर प्रयागराज येथे महाकुंभमेळा भरतो.


 ज्योतिषीय संबंध =

सूर्याभोवती भ्रमण करणारे नऊ ग्रह एका रेषेत येतात त्यावेळी सूर्याचे किरण ज्या स्थानावर पडतात तिथे कुंभमेळ्याचे औचित्य असते असे मानले जाते

 

साधू समूहाचा सहभाग =

कुंभमेळ्यात विविध आखाड्यांच्या साधू मंडळींचा सहभाग हे याचे वैशिष्ट्य आणि अविभाज्य भाग मानला जातो.या विषयावर आख्यायिका मानली जाते की भगीरथाने प्रयत्न करूनही गंगा नदी पृथ्वीवर अवतरण करायला तयार होत नव्हती, त्यावेळी तिला असे सांगितले गेले की कुंभमेळा प्रसंगी तुझ्या पाण्यात साधू स्नान करतील. हे ऐकताच तिने पृथ्वीवर येण्याचे मान्य केले. त्यामुळे कुंभमेळ्यात विविध आखाडे आणि साधू यांचे विशेष महत्त्व आहे. या उत्सवात विविध साधू आणि त्यांचे आखाडे यामध्ये होम-हवन, वैदिक मंत्रांचे पठण, प्रवचने, लोकांना उपदेश करणे असे अनेक विविध उपक्रम पहायला मिळतात.

 

 आखाडा संकल्पना =

कुंभमेळ्यात सहभागी होणारे साधू त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आखाड्याचे सदस्य असतात. काही साधू स्वतंत्रपणेही सहभागी होताना दिसतात.

शैव

वैष्णव

उदासीन

नागा

नाथपंथी

परी (केवळ स्त्रियांचा)

किन्नर (तृतीय पंथीय सदस्य)

असे आखाडे आहेत.


No comments:

Post a Comment

Plot vs Flat – Which One Is the Better Investment Option?

  Plot vs Flat: Key Considerations Effort Plot: Investing in a plot demands substantial effort. It involves an intricate process, from draft...